वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतलेल्या विक्रांत पाटील यांनी विद्याथ्यचि व युवांचे प्रश्न है स्वतःचे प्रश्न मानून सातत्याने लढा दिला. भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदयाच्या विचारधारेने प्रेरित होऊन विद्यार्थी विभागाच्या मंडळ स्तटापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास, युवक मोर्चा प्रदेशाध्यक्ष ते आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचला आहे.
2020 मध्ये युवक मोचचेि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी टराज्यभर युवा प्रश्नांसाठी लढा दिला, संघटनात्मक बांधणी, आंदोलने, अभियानांच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यानंतर प्रदेश महासचिव म्हणून पक्षाने दाखवलेला विश्वास म्हणजे त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.
2017 मध्ये पनवेल महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर उपमहापौरपद भूषवले. या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस काम करत लोकसेवेचा दर्जा उंचावला.
आज विक्रांत पाटील हे विधान परिषदेचे आमदार म्हणून नव्या जबाबदारीतून अधिक व्यापक पातळीवर कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांपासून आमदारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे कष्ट, संघर्ष, आणि कार्यक्षमतेचा आदर्श आहे.
Copyright © 2023 Vikrant Patil
Design & Developed by Advaita Design & Innovation