राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून ते परिवर्तन घडवण्याचे माध्यम असते — ही ठाम भूमिका घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणारे विक्रांत दादा पाटील हे आज महाराष्ट्रातील भाजपचे एक अभ्यासू, संवेदनशील आणि जाज्वल्य युवा नेते म्हणून ओळखले जातात.
विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी समाजातील अन्याय, बेरोजगारी, शिक्षणातील विसंगती, तरुणांच्या अडचणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेतली. हे प्रश्न केवळ बघत राहण्यापेक्षा त्यांच्यासाठी संघर्ष करणे हेच जीवनकार्य व्हावे, अशी भावना त्यांच्या मनात रुजली. आणि याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला.
भारतीय जनता पार्टीच्या सर्वसमावेशक विचारसरणीने आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे “अंत्योदय” तत्त्वज्ञान याने त्यांना प्रचंड प्रेरणा दिली. शेवटच्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम हेच खरे राजकारण मानून त्यांनी भाजपच्या विद्यार्थी आणि युवा आघाडीतून आपली कार्ययात्रा सुरू केली.
त्यांनी सर्वात आधी भा.ज.यु.मो.च्या विद्यार्थी विभागाच्या मंडल स्तरावरील जबाबदारी स्वीकारली. यानंतर जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष व जिल्हा युवा मोर्चा प्रमुख अशा विविध पदांवर कार्य करत त्यांनी युवकांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम केले.
२०१० साली भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी त्यांची निवड झाली. ही एक मोठी जबाबदारी होती. तीन वर्ष सतत महाराष्ट्रभर दौरे करत, बैठका, मोहीमा आणि शिबिरे यांद्वारे त्यांनी युवा मोर्चाच्या कामाला नवा उगम दिला.
२०१५ मध्ये सन्माननीय पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव म्हणून जबाबदारी मिळाली. नंतर सन्माननीय योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महासचिव पद त्यांनी समर्थपणे सांभाळले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो युवकांपर्यंत पोहोचून संघटनबांधणीचे ठोस कार्य त्यांनी केले.
२०२० मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. हे नेतृत्व काळ संकटांचा आणि संघर्षांचा होता. भाजप सत्तेत नसताना युवकांचे प्रश्न प्रखरपणे मांडणे, राज्यभर आंदोलन करणे, आणि युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे — हे त्यांनी मोठ्या निष्ठेने केले.
“नोकरी नाही, धोरण नाही, शिक्षण बिघडले” असे अनेक मुद्दे घेऊन त्यांनी राज्य शासनाला जाब विचारणारे शेकडो आंदोलनं केली. युवकांना आश्वासक नेतृत्व देणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिमा उजळली.
सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप प्रदेश महासचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. हे पद म्हणजे पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास होता.
घराणेशाहीपासून दूर राहून, सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यालाही पक्ष मोठी संधी देतो, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. विक्रांत दादांचा प्रवास भाजपच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठरतो.
संघटनात्मक राजकारण करत असतानाच त्यांनी आपल्या प्रभागात सामाजिक कार्य सुरूच ठेवले. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१७ साली नगरसेवक म्हणून निवडून आले. ही लढत अटीतटीची होती. फार मोठ्या आर्थिक ताकदीला जनतेच्या आशीर्वादाने हरवत त्यांनी विजय मिळवला.
यानंतर त्यांना पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शहर विकास अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
त्यांच्या संपूर्ण प्रवासाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आणि त्यांना राज्य विधिमंडळाचे सदस्य (आमदार) म्हणून संधी मिळाली. आज ते केवळ राजकीय प्रतिनिधी नाहीत, तर एक युवा प्रेरणा, कार्यकर्त्यांसाठी दिशा, आणि सामान्यांसाठी आश्वासक आवाज बनले आहेत.
Copyright © 2023 Vikrant Patil
Design & Developed by Advaita Design & Innovation