वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग राहिला विद्यार्थी आणि युवांचे असंख्य प्रश्न मनाला कायमच वेदना देत होते. या विषयात काम केले पाहिजे ही भावना सातत्याने हृदयात होती आणि म्हणून बाहेर राहून केवळ बघत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष या प्रक्रियेत उतरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल का हा विचार मनात आला. यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सक्रिय समाजकारण व राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
भारतीय जनता पार्टीची सर्वसामावेशक विचारधारा आणि शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसेपर्यंत कार्य करत राहण्याची पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदयाची शिकवण यावर प्रभावित होऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या विद्यार्थी विभागाची मंडल स्थरावरील पहिली जबाबदारी स्वीकारली. यानंतर विद्यार्थी विभाग जिल्हाध्यक्ष, पुढे युवा मोर्चा मंडलाध्यक्ष त्यानंतर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशा स्थानिक पातळीवरील जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.